Home महाराष्ट्र हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण?; तृप्ती देसाई यांचा सवाल

हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण?; तृप्ती देसाई यांचा सवाल

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या  रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली. यावरुन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.

आवाज कोणाचा? माज हा सत्तेचा, महिलेवर दबाव आणून हाणून पाडला राष्ट्रवादी पुन्हा, असं म्हणत तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

मंत्र्यांच्या विरोधात यापुढे आता महिला तक्रार करायला घाबरतील, कारण धमक्या आणि दबाव आणून रेणू शर्माला, तिच्या वकिलांना तक्रार मागे घ्यायलाच लावली. असं म्हणत हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण?, असा सवाल करत तृप्ती देसाई यांनी यावेळी केला.

दरम्यान, बलात्काराच्या तक्रारीत, विवाहबाह्य संबंधात धनंजय मुंडे बिनविरोध विजयी, असं म्हणत तृप्ती देसाई यांनी धंनजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.

आवाज कोणाचा? माज हा सत्तेचा, महिलेवर दबाव आणून हाणून पाडला- राष्ट्रवादी पुन्हा.
बलात्काराच्या तक्रारीत, विवाहबाह्य…

Posted by Trupti Desai on Thursday, 21 January 2021

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडे प्रकरणवरुन संजय राऊतांचा भाजपला सल्ला; म्हणाले…

“आता स्टीव्ह स्मिथ नव्हे, तर ‘हा’ असेल राजस्थान राॅयल्सचा नवा कर्णधार”

आता नारायण राणेंना सुखानं झोप लागेल- शरद पवार

“सरकार पाडण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न, पण…”