Home महाराष्ट्र जावई बापूंनी आता डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

जावई बापूंनी आता डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई : जावई बापूंनी आता डोंबिवलीकडे लक्ष द्यावे, असं म्हणत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीतील समस्यांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.

मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे. डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहराच्या दुरावस्थेसाठी जबाबदार एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख होती. पण हे शहर आता प्रदूषणाचे शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी बहुतांश भाग उद्योग, निवासी असा आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावत आहेत, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे

दरम्यान, कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न जैसे थे असून तो दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, नाले तुंबणे यासाठी हेच अधिकारी जबाबदार आहेत. याबाबत आम्ही सतत आंदोलन करुनही आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही या सरकारला कायमची सत्ता दिलेली नसून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ- नारायण राणे

फडणवीसांना नागपूर जिंकता आलं नाही आणि ते बारामतीच्या जिंकण्याच्या गोष्टी करतात

चेहरा झाकून हल्ला करता आणि स्वत:ला मर्द समजता- सुनील शेट्टी

पहिल्याच बैठकीत शरद पवारांचा मंत्र्यांना मोलाचा सल्ला, म्हणतात…