“दिल्लीतील हिंसा सुनियोजित त्याला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

0
451

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून संपुर्ण देशातील वातावरण तापलं आहे. अशातच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधलाय.

शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत सुनियोजित हिंसा घडवण्यात आली आहे. त्याला अमित शहाच जबाबदार असून त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या आडून सुनियोजित हिंसा भडकवली गेली आहे. त्याला अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना एकक्षणही पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा- अजित पवार

…तर झेपत नाही म्हणून जाहीर करा; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यावर टीका

“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”

“सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार असून आपण अंतिम पर्वाच्या दिशेने”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here