मुंबई : काल सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल जाहिर झाले. यात भाजपची चांलगीच पिछेघाट झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:चा नागपूर जिल्हाही गमावावा लागला. यावरुन नेटकऱ्यांनी फडणवीसांना ट्रोल करण्यास सुरु केलं आहे.
फडणवीसांना स्वत:ची नागपूर जिल्हा परिषद जिंकता येत नाही आणि बारामती जिंकण्याच्या गोष्टी करतात, असं म्हणत एका नेटकऱ्याने फडणवीसांवर निशाणा साधला. नागपूरचं काय ते बोला, एक केंद्रीय मंत्री आणि 5 वर्षे मुख्यमंत्री तरी निकाल 00, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
नागपूरमध्ये भाजपने सलग 12 वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता भोगली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या उगमाने भाजपला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
दरम्यान, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं विजय मिळवत भाजपच्या बालेकिल्ल्यालाच हादरा दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
चेहरा झाकून हल्ला करता आणि स्वत:ला मर्द समजता- सुनील शेट्टी
पहिल्याच बैठकीत शरद पवारांचा मंत्र्यांना मोलाचा सल्ला, म्हणतात…
दिपीका पादुकोणचा विद्यार्थ्यांना पाठिंबा,जेएनयूमध्ये लावली हजेरी
देवेंद्र फडणवीस यांना उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे- अनिल गोटे