मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातील पक्ष आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत, असं म्हणत राज्यात महाआघाडीसमोर भाजप 20 टक्के देखील नाही”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ते प्रसार माध्यमाशी बोलत होते.
माझ्याकडे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील निकालाची माहिती आहे. 13 हजार 295 जागांच्या निवडणुका झाल्या आहेत. 3 हजार 276 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. काँग्रेसला 1 हजार 938 जागांवर यश मिळालं आहे.भाजप 2 हजार 942 जागांवर विजयी झाली आहे व शिवसेना 2 हजार 406 जागांवर विजयी झालेली आहे, अशा माझ्याकडे आलेली माहिती आहे. त्यामुळे आकडे बोलके आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना तिन्ही पक्षांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत. सर्वात समाधानाची बाब ही आहे, या सर्व गडबडीत भाजपाचं अस्तित्व फार मर्यादित राहिलं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”
“मी सुद्धा खासदार आहे, असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”
“भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आपला पराभव स्वीकारावा”