मुंबई : 2019 च्या वेळी भाजप आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली होती. मात्र हे सरकार केवळ 72 तास टिकलं होतं. त्यावेळी सरकार स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसोबत झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याच मुद्दयावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांना सुरुवातीला यश मिळतं पण त्यांचा अंत वाईट असतो. स्वतःला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही., असं ट्विट करत निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांना सुरुवातीला यश मिळतं पण त्यांचा अंत वाईट असतो. स्वतःला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही. https://t.co/UHoQKEKtSh
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 19, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“…नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही”
“भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं”
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही- बाळासाहेब थोरात
जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या-अजित पवार