मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. या प्रकरणावर बोलतना मुंडेनी राजीनामा देण्याची गरज नाही असं शरद पवार म्हणाले होते. यावरून भाजप नेते आणि अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही… pic.twitter.com/ppOxUenA71
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 16, 2021
महत्वाच्या घडामोडी-
पुलवामा हल्ला प्रकरणी अर्णब गोस्वामींचा संदर्भ देत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…
“आता महाराष्ट्र-मुंबईतील देशी-ओवेसी कोण? ते लवकरच कळेल”
“त्यावेळी धनंजय मुंडेंना शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी”
ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; संतप्त ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन