Home महाराष्ट्र ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; संतप्त ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; संतप्त ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

औरंगाबाद : औरंगाबाद येथे ग्रामपंचायत वादातून भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी गावात ही घटना घडली. हरिसिंग गुशिंगे असं या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. दिवसभर मतदान होतं. त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मतदानात व्यस्त होते. संध्याकाळी थोडी उसंत मिळाल्याने सर्वजण घरी आले होते. मात्र रात्री 10 नंतर गुशिंगे यांच्या हत्येची बातमी आल्यानंतर गावकरी एकदम हादरून गेले. त्यामुळे गावकऱ्यांनी गुशिंगे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गुशिंगे यांची हत्या केल्याचं गावकऱ्यांना समजलं. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण तयार झालं.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे. गुशिंगे यांची हत्या कुणी केली याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र, ग्रामपंचायतवादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना पकडलं जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तापलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ

“भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन”

…नाहीतर हाच निलेश राणे तुमची घमेंड उतरल्याशिवाय राहणार नाही; अजित पवारांनी केलेल्या टीकेला निलेश राणेंच प्रत्युत्तर

“एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, अथवा शंभर काय मोदींना काहीच फरक पडत नाही”