दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये- रामदास आठवले

0
136

मुंबई : नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतातद की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो. मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचाराविरुद्ध मी मूळ पँथर असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये, अशी टीका रामदास आठवले यांनी संजय राऊतांवर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मार्कस स्टाॅयनिसचे शानदार अर्धशतक; दिल्लीचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरला 197 धावांचे लक्ष्य

“….यामुळे भाजपा नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह”

दानवे किती रस्त्यावर असतात हे माहीत आहे; बाळासाहेब थोरातांचा दानवेंना टोला

नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here