Home महाराष्ट्र धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात?; ‘या’ भाजप नेत्याने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात?; ‘या’ भाजप नेत्याने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या 2 पत्नी वाद प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगांना पत्र लिहिलं आहे.

धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केलेला नाही, असा दावा करत याप्रकरणाची मुंडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पत्रात केली आहे.

मी या पत्रासोबत महाराष्ट्रातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यासंबंधीची काही कागदपत्रे जोडली आहेत. त्यानुसार, मुंडे यांनी आपण दोनदा लग्न केल्याचं जाहीर केलं असून दोन्ही पत्नींची आणि मुलांची काळजी घेत असल्याचंही म्हटलं आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना ऑक्टोबर 2019 मध्ये आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या 2 पत्नींची तसेच सर्व मुलांची माहिती आणि त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती लपवली होती. त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, असं सोमय्या यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो; 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”

“मुस्लिम नागरिक 4 विवाह करतात, धनंजय मुंडेंनी 2 केलं तर काय बिघडलं?”

धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील

“हिंदू धर्मात 2 पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील”