मुंबई : एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा, अशी दुटप्पी भूमिका काही पक्षातील नेते करत आहेत. असं म्हणत भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधलाय.
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र शेतकऱ्यासाठी आम्ही काम करतो असे खोट बोलून फक्त आमदारी मिळावी यासाठीचे प्रयत्न दिसून येत आहेत. एकाबाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. हे उद्योग बंद करा,” असं सदाभाऊ खोत म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्या”
नितेश राणे हे हँग आहेत, त्यांना काही कळत नाही; शिवसेनेची टीका
MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा
योगी की मौत सुनिश्चित हैं; आम आदमी पक्षाच्या सोमनाथ भारती यांचं वक्तव्य, पहा व्हिडीओ