मुंबई : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात तर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. त्याला शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे हे पहिले हँग आहेत. त्यांना काही कळत नाही आणि ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात. चाराण्यासारख्या गोष्टी करणाऱ्यांनी अशाप्रकारे बोलावं याचं मला आश्चर्य वाटतंय, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
कोणाला सुरक्षा द्यावी कोणाला नाही द्यावी हे शासन ठरवेल. अभिनेत्री कंगणा रनौतला सुरक्षेची किती गरज होती? हे आपण केंद्र सरकारला विचारलं पाहिजे. कंगणाला अशी सुरक्षा दिली की तशी महाराष्ट्रात मंत्र्याला सुरक्षा नाही. कंगणाला मंत्र्यापेक्षाही जास्त सुरक्षा देण्यात आली. सुरक्षेची कुणाला आणि किती आवश्यकता आहे? याचा रिपोर्ट प्रशासन देते, त्यानुसार सुरक्षा दिली जाते, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान, सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती, अशी टीका नितेश राणेंनी केली होती.
महत्वाच्या घडामोडी-
MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा
योगी की मौत सुनिश्चित हैं; आम आदमी पक्षाच्या सोमनाथ भारती यांचं वक्तव्य, पहा व्हिडीओ
“मुलगी झाली हो! विरूष्काने दिली Good News”
हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपच्या ‘या’ खासदाराचं वक्तव्य