मुंबई : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असून मुंबई महापालिका निवडणुकीवर सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे. ही बिघडलेली आघाडी आहे. यांनी राज्याला बिघडवू नये एवढीच आमची इच्छा आहे, असं म्हणत आशिष शेलारांनी सरकारला टोला लगावला आहे.
युतीमध्ये लढल्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये नेहमी शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजप वेगळी निवडणूक लढणार असल्याने राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर निवडून येणार, असं शेलार म्हणाले.
दरम्यान, फोडाफोडीचे राजकारण कितीही केलं तरी दुर्बलाला बळाचं बळ कधीच मिळू शकत नाही. तसेच आम्ही स्वबळावर लढणारे आहोत., असा टोमणाही शेलारांनी सरकारला यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी-
“बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं”
मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही- अतुल भातखळकर
“कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचं निधन”
“…त्यामुळे सर्व महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार”