मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असताना मराठी कलाकारांनी एकाचवेळी ट्वीटरवर #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्वीट केले होते. यावर सगळीकडून कलाकारांवर टीकीची झोड उठल्यानंतर मराठी कलाकारांकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
आम्ही कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला नाही, याबाबत लवकरच भूमिका मांडू, असं स्पष्टीकरण कलाकारांनी दिलं आहे.
आमची पोस्ट ही कोणत्याही युती आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन करण्यासाठी किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटंल की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुरळा’ आपलं अयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्या बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं त्यामागची भुमीका आपल्याला लवकरच कळेल, असं म्हणत कलाकारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
— Siddharth Jadhav (@SIDDHARTH23OCT) November 15, 2019
— Sai (@SaieTamhankar) November 15, 2019
मराठी अभिनेते अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांच्यासह अनेकांनी सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा एकच हॅशटॅग वापरुन ट्विट केलं होतं. त्यामुळे काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला होता.