मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती देताना आपल्या बेनामी संपत्तीची माहिती लपवली, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अन्वय नाईक यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे मोठे आर्थिक संबंध आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची 23 हजार 500 चौरस फूटांची 19 घरं आहेत. ही एकूण 5.29 कोटींची बेनामी मालमत्ता आहे. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आदेशानं 200 कोटी रूपयांचा फायदा बिल्डर्सला दिला जात आहे. या बिल्डर्सला देण्यात आलेला 999 वर्षांचं करारपत्र दाखवावंच असं माझं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान आहे,” असंही किरीट सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
भंडारा येथील जिल्हा रूग्णालयाला आग; 10 बालकांचा आगीत जळून मृत्यू
माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर… ; अजित पवारांनी पोलिसांसमोर दिला दम
“उधार‘राजाचे जाहीर आभार”; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला