पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी बंद झाली पाहिजे. तसंच वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत, सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. त्यात त्यांचा काय दोष? गुंडांकडून होणारा त्रास थांबला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगतो की, तो कुठल्या पक्षाचा, गटाचा, याचा विचार न करता महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीदेखील गुन्हेगारीच्या निमित्ताने चुकीचं वागत असेल तर त्याला कडक शासन करा. मी तुमच्यासोबत आहे. अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा, मग मी त्या फोनवाल्या व्यक्तीकडे बघतो. माझी मतं आणि भूमिका स्पष्ट असते, असंही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“उधार‘राजाचे जाहीर आभार”; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच- उदयनराजे भोसले
“नागपूरमध्ये पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागून इंजिनियरचा मृत्यू”