Home महाराष्ट्र मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव- किरीट सोमय्या

मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव- किरीट सोमय्या

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्तीची संपत्ती स्वत:च्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला होता, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात जाऊन ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

ही मृत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्वय नाईक आहेत, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. मृत अन्वय नाईक यांच्या मालकीची 5 कोटी 29 लाख किंमतीची मालमत्ता ग्रामपंचायतीने ठाकरे कुटुंबाच्या नावे कशा प्रकारे केल्या हे पाहून मान शरमेने खाली जाते., असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, 2014 मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून ठाकरे परिवाराने करार केला होता. नाईक यांच्या मृत्यूनंतर ठाकरे परिवाराने ही जमीन स्वत:च्या नावे करून घेतली. हे सर्व व्यवहार आम्ही कोर्टात उघड करू, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे .

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरेंना, राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?; नारायण राणेंचा हल्लाबोल

औरंगाबादच्या नामांतरावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

“छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये”