Home महाराष्ट्र औरंगाबादच्या नामांतरावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

औरंगाबादच्या नामांतरावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून त्यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. एकीकडे औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत असताना काँग्रेसचा मात्र त्याला विरोध आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत नामांतराला विरोध असल्याचं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे आलं. गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी पुण्याचं नाव बदलण्याची मागणी केल्यासंबंधी त्यांना विचारण्यात आलं असता, ते म्हणाले, कोणी काय मागणी करावं हा ज्याच्या त्याचा आधिकार आहे. कोणी भावनिक मुद्दे काढतं, कोणी विकासाबद्दल बोलतं, कोणी नामकरणाबद्दल बोलतं. अशा गोष्टी महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात घडल्या आहेत. त्यामुळे एका शहराचा मुद्दा आला तर दुसऱ्या शहरांचाही उल्लेख होते. आपल्या वक्तव्याच्या बातम्या झाल्या की मग इतरांनाही सुचू लागतं., असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

“छत्रपती संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये”

अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता; अमोल मिटकरींचा घणाघात

“ठाण्याची श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलियाची ‘मिस इंडिया’!”