मुंबई : औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र काँग्रेसने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय?, असा सवाल यावेळी अरविंद सावंत यांनी काँग्रेस नेत्यांना केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घोषित केलं आहे. तेव्हापासून हा लढा सुरु आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवानं तसं झालं नाही., असं सावंत म्हणाले.
दरम्यान, आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. कोरोनामुळे राहिलं होतं पण आता हे काम होईल, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“शिवसेनेला रोखण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपची काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी”
मोठी बातमी! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी
भाजपात खरी ताकद असेल तर…; अमोल मिटकरी यांच भाजपला आव्हान
“सोनिया गांधी, मायावती यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”