अकोला : महाराष्ट्रात सध्या नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्येयुद्ध सुरु आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
गुजरातची सत्ता किती काळ भाजपजवळ आहे?, एवढ्या दिवसात अहमदाबादच नाव का बदललं नाही?, असा सवाल करत भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं मिटकरी म्हणाले.
1990 आणि 2001 मध्ये भाजपने घोषणा केली होती की आमची सत्ता आल्यावर अहमदाबाद शहराचं नाव बदलू… तिथं कित्येक वर्षे तुमचंच सरकार आहे, मग आजून अहमदाबादचं नाव कर्णावती का झालं नाही?, भाजपच्या काळात अहमदाबादचं नाव कर्णावती झालं नाही तर गुजरातची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात द्या, दुस-याच दिवशी कर्नावती नाव आम्ही करुन दाखवू, असंही मिटकरी म्हणाले.
दरम्यान,औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“सोनिया गांधी, मायावती यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”
“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”
ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, ही तर औरंगजेब सेना; भाजपचा सेनेवर हल्लाबोल
“किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी एकापेक्षा एक हाॅट माॅडेल्सचे फोटोशूट”