संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

0
217

मुंबई :  राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु यावरूनच आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला गांभीर्य नसलेला पक्ष म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

ही राजकारण करण्याची वेळ नाही. विरोधी पक्षावर टीका करणारे संजय राऊत हे कोण आहेत?, ते शरद पवार यांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत. या परिस्थितीत केंद्रातील आणि राज्यातील सरकार सोबत आहे, अशी टिका अनिल बोंडे यांनी केली आहे.

दरम्यान, गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, अशी टिका संजय राऊत यांनी भाजपवर केली होती.

महत्वाच्या घडामोडी-

पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड

सांगलीत घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा दणका; केल्या तब्बल 350 वाहने जप्त

राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here