Home महाराष्ट्र “सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून”

“सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून”

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचा लिलाव होत असल्याच्या घटनांची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशी करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल दिली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकशाहीची क्रूर थट्टा, भीषण खून चाललेला आहे. त्यामुळे गावामध्ये बिनविरोध निवडून येण्यासाठी विकास निधीचं आकर्षण दाखवणं हे ठीक आहे. पण सरपंचपदाची बोली बोलायची आणि बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली हे स्वागतार्ह आहे, असं ट्विट करत चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेकडून नितीन गडकरी यांचं काैतुक”

“मोठी बातमी! भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा दाखल”

“कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल”

विदर्भवासियांनो मी तुम्हांला वचन देतो की,…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला शब्द