नागपूर : नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोमवारी झाले. याप्रसंगी शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे काैतुक केले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना गडकरी यांनी अनेक चांगले रस्ते बनवले. आता ते देशात गुळगुळीत रस्ते तयार करीत आहेत. आता राज्याचे परिवहन मंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे की, त्या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित राहावी. यासाठी चांगले वाहनचालक तयार होणे, योग्य माणसांनाच वाहन परवाने मिळणे गरजेचे असून त्यासाठी राज्यात प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी गडकरी यांनी केंद्राच्या निधीतून मदत करावी, असं अनिल परब म्हणाले.
दरम्यान, यावर गडकरी यांनी प्रत्युत्तर देत मी विधान परिषदेपासून परब यांचे काम पाहत आहे. आता परिवहन विभागातही परब चांगले काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात परिवहन विभागात चांगले बदल घडतील, असं गडकरी म्हणाले. देशात आणि राज्यात अपघात घडविणारे हजारो ब्लॅक स्पॉट आहेत. 2024 च्या आधी ते निम्याने कमी करायचे असून महाराष्ट्रात हे काम करण्यासाठी अनिल परब यांच्या मदतीची गरज आहे, असं गडकरी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“मोठी बातमी! भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा दाखल”
“कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल”
विदर्भवासियांनो मी तुम्हांला वचन देतो की,…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला शब्द
औरंगाबादच्या नामांतरावर आता राष्ट्रवादीचीही भूमिका जाहीर