पुणे : भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे जळगाव येथील असून, ते वकील आहेत. तर ते जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत.
दरम्यान, गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल”
विदर्भवासियांनो मी तुम्हांला वचन देतो की,…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला शब्द
औरंगाबादच्या नामांतरावर आता राष्ट्रवादीचीही भूमिका जाहीर
औरंगाबाद नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं- प्रकाश आंबेडकर