मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी रोहित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असं रोहित पवार यांनी म्हटलं. तसेच शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, रोहित पवारांनी ईडीच्या मुद्दयांवरूनही भाष्य केलं. कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
विदर्भवासियांनो मी तुम्हांला वचन देतो की,…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला शब्द
औरंगाबादच्या नामांतरावर आता राष्ट्रवादीचीही भूमिका जाहीर
औरंगाबाद नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं- प्रकाश आंबेडकर
“भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही”