नागपूर : नागपुरमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधिमंडळ सचिवालय कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन करत उपस्थितांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विदर्भावासियांना एक वचनही दिलं.
गेल्या हिवाळी अधिवेशनात आपण सर्वजण तिथे होतो. तेथील विधीमंडळाची वास्तू मी पाहत होतो. सुंदर अशा या वास्तूला एक इतिहास आहे. अशा वास्तुमध्ये अधिवेश होत असताना तेवढ्या काळापुरतं कार्यालय चालू ठेवणं योग्य नव्हतं. पण आता बाराही महिने कार्यालय चालू राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मी विदर्भवासियांना एक वचन देतो की, तुम्ही नेहमी आमच्या ह्दयाजवळ आहात. तुमच्यावर कधीही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कोण करत असेल तर ढाल म्हणून उभे राहू. तुमच्या हक्काची व्यक्ती, सरकार म्हणून उभे राहू, असं वचन उद्धव ठाकरेंनी यावेळी विदर्भवासियांना दिलं.
महत्वाच्या घडामोडी-
औरंगाबादच्या नामांतरावर आता राष्ट्रवादीचीही भूमिका जाहीर
औरंगाबाद नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं- प्रकाश आंबेडकर
“भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही”
मनसेतही मेगा भरती सुरू; ‘कृष्णकुंज’बाहेर लोकांची गर्दी