Home महाराष्ट्र औरंगाबाद नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं- प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं- प्रकाश आंबेडकर

मुंबई : औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र काँग्रेसने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच 5 वर्ष सरकारमध्ये असताना भाजप-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही, याचा खुलासा त्यांनी आधी करावा., असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुघलांच्या काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक राहायला हवे. दुसरा भाग संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच स्मरण राहावं, असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर अधिक उचित होईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही”

मनसेतही मेगा भरती सुरू; ‘कृष्णकुंज’बाहेर लोकांची गर्दी

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल

‘त्यांना चपलेने मारायचं’; जुना व्हिडिओ पोस्ट करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला