Home महाराष्ट्र …तेंव्हा शिवसेनेचे नेते काय गोट्या खेळत होते का?- राम कदम

…तेंव्हा शिवसेनेचे नेते काय गोट्या खेळत होते का?- राम कदम

मुंबई : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष चालू आहे. यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपसोबत शिवसेना 5 वर्ष सत्तेत होती. त्यावेळेस शिवसेनेनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे का पाठवला नाही?, तेंव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का?, असा सवाल करत राम कदम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यावर आता शिवसेनेला पुन्हा हा मुद्दा उपस्थित करावासा वाटत आहे, असा टोलाही राम कदमांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

“राम मंदीराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडे जाणार”

“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि राहतील”

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच- अशोक चव्हाण

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल