जालना : औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच आहे, असं म्हणत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी भूमिका मांडली आहे. ते शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल
“आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही”
“बाळासाहेब ठाकरेंनी तीस वर्षांपूर्वीच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केलं”
…मग गांधीची हत्या करणारा गोडसे कोण होता?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल