Home महाराष्ट्र बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे…; कॅलेंडरवरुन भाजपची शिवसेनेवर टीका

बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे…; कॅलेंडरवरुन भाजपची शिवसेनेवर टीका

मुंबई : शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा करण्यात आला आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही”, असा घणाघात अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.

दरम्यान, औरंगाबादचं संभाजीनगर नाही, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नामकरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने करुन दाखवलं, असंही अतुल भातखळकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“तुम्ही संपादिका आहात…,” चंद्रकात पाटील लिहिणार रश्मी ठाकरेंना पत्र

“शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”

केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाहीत, लोकं सांगतात अन्…;प्रकाश आंबेडकर

2020 नं खूप काही शिकवलं- उपमुख्यमंत्री अजित पवार