पुणे: सामना अग्रलेखात वापरल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासंबंधीही भाष्य केलं.
दरम्यान, संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”
केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाहीत, लोकं सांगतात अन्…;प्रकाश आंबेडकर
2020 नं खूप काही शिकवलं- उपमुख्यमंत्री अजित पवार
“कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार”