Home महाराष्ट्र 2020 नं खूप काही शिकवलं- उपमुख्यमंत्री अजित पवार

2020 नं खूप काही शिकवलं- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : मावळते वर्ष कोरोना संकटाशी लढण्यातच निघून गेले. येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो. मावळत्या 2020 या वर्षाने आपल्याला जीवनाच्या बाबतीत खूप काही शिकवलं. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरूवात करुया., असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

आता नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो आणि साऱ्यांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो., असं अजित पवार म्हणाले. तसेच कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने मास्क लावणे, गर्दी टाळणे, हात वारंवार धूत राहणे या त्रिसूत्रीचे पालन करूया., असं आवाहन अजित पवारांनी जनतेला केलं.

कोरोनापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे व समाजाचे संरक्षण करत दैनंदिन व्यवहार हळूहळू काळजीपूर्वक सुरु करूया, असं नम्र आवाहनही अजित पवारांनी केलं.

दरम्यान, येणारे हे नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करुन देणारे आणि राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारे ठरेल, असा विश्वासही अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी-

“कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार”

“मुख्यमंत्री महोदय, आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे भाषणात नाही तर कृतीत दिसू द्या”

पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभे असतो, पण…; मेहबूब शेख प्रकरणावर रोहित पवारांचं भाष्य

“आधी धुळे, आता रायगड; शिवसेनेचा आणखी एका ग्रामपंचायतीवर भगवा”