पनवेल : 15 जानेवारी 2021 ला पार पडत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यांमधून निवडणुकीपूर्वीच खानावळे ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याचे निश्चित मानले जात आहे.
खानावळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पनवेल तालुक्यातून 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी खानावळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकूण 9 सदस्यपदासाठी उमेदवार उभे राहिले, त्यापैकी 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे 5 सदस्य तर 1 अपक्ष सदस्य बिनविरोध निवडणूक जिंकले.
दरम्यान, त्यामुळे खानावळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता 3 सदस्यपदांसाठी निवडणूक लढली जाणार आहे. मात्र ग्रामपंचायतीवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी लागणारी सदस्य संख्या शिवसेनेच्या पारड्यात असल्यामुळे या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्चित झाले आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा ही निवडणूक निकालातच स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे हळूहळू संपवण्याचं काम करतंय”
अभिनेत्री कियारा अडवाणी मालदीवच्या बीचवर; बॅकलेस ड्रेसमध्ये HOT अदा
“राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”
राम शिंदेंनी केलेल्या टीकेला रोहित पवारांच प्रत्युत्तर; म्हणाले…