Home महाराष्ट्र महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की…; रोहित पवारांची भाजपवर...

महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की…; रोहित पवारांची भाजपवर टीका

मुंबई कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला महिना उलटूनही सरकार तोडगा काढू शकलं नाही याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय. रोहित पवार यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.

महाराष्ट्र भाजप तर रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की आपण काय बोलून जातो याचंही त्यांना भान राहत नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व संपणार नाही, असं केंद्र सरकार म्हणतं आणि दुसरीकडं कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड महाराष्ट्र भाजपचे नेते करतात. एकंदरीतच सगळाच सावळा गोंधळ सुरुय, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजपा सरकारने 42 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि आघाडी सरकारने 29 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असल्याचं भाजपचे नेते अभिमानाने सांगतात. पण त्यांनी हेही सांगावं की भाजपा सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करून प्रत्यक्षात केवळ 19833 कोटींची म्हणजेच जाहीर केल्याच्या केवळ 58% कर्जमाफी दिली, असंही रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत”

“चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे”

“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे”

चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र; विजय वडेट्टीवारांचा टोला