राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांनी गेल्या दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन केलं आहे. मात्र या आंदोलनावर सरकार जास्त गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाससेवक अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यासाठी आपण दिल्लीत न जाण्याची भाजपची विनंती अण्णांनी धुडकावून लावत, अण्णा हजारेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. ‘सामना’ ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
ज्या देशात सरकार लेखी वचन देते व ते वचन पाळत नाही, अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
शेतीमालाला हमीभाव देण्यासंबंधी उच्चाधिकार समिती नेमण्याचे आश्वासन केंद्राने दोनवेळा दिले. मात्र ते आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आता आंदोलन करायचं ठरवलं आहे, असंही अण्णांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांचा छापा; सुरेश रैना, सुझेन खानसह 34 जणांवर गुन्हा दाखल
“धक्कादायक! लंडनहून विमानाने भारतात आलेले ‘इतके’ प्रवासी आढळले कोरोना पाॅझिटिव्ह”
राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय- इम्तियाज जलील
“गद्दार राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”