Home महाराष्ट्र राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय- इम्तियाज जलील

राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय- इम्तियाज जलील

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ख्रिस्ती बांधव रात्री 12 वाजल्यापासून ख्रिसमस सोहळ्याची सुरुवात करतात. त्यांच्यासाठी हा एकमेव असा सर्वात मोठा सण असून राज्यात रात्रीच्या संचारबंदीमुळे या सणात अडसर ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा व मध्यरात्रीनंतरही चर्च खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती जलीलांनी केली आहे.

कोरोनाने राज्य शासनासोबत चर्चा केली आहे का?, मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल, असा सवाल करत जलीलांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय असल्याचंही जलील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“गद्दार राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”

स्वतः राजकारण करायचं आणि भाजपावर राजकीय आरोप करून चर्चेत रहायचं- प्रविण दरेकर

“केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं”

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे