मुंबई : श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपला लगावला होता. त्यावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.
संजय राऊत यांची अतिशय दुटप्पी भूमिका आहे. काहीतरी बोलून चर्चेत राहायचं अशा प्रकारचे त्यांचे धोरण दिसत आहे, असं म्हणत प्रविण दरेकरांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
पहिले मंदिर फिर सरकार, असे याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. परंतु सरकार आल्यावर त्यांनी मंदिराचा विषय बासनात गुंडाळून ठेवला. स्वतः राजकारण करायचे आणि भाजपावर राजकीय आरोप करून चर्चेत रहायचे असे त्यांचे धोरण आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.
पहिले मंदिर फिर सरकार, असे याचं @rautsanjay61 यांनी सांगितलं होतं.परंतु सरकार आल्यावर त्यांनी मंदिराचा विषय बासनात गुंडाळून ठेवला. स्वतः राजकारण करायचे आणि भाजपवर राजकीय आरोप करून चर्चेत रहायचे असे त्यांचे धोरण आहे.@BJP4Maharashtra @TV9Marathi @abpmajhatv @TheMahaMTB pic.twitter.com/Cc8hE5sXmY
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्राचं पथक आत्ता राज्यात म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं”
महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन”
भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील