मुंबई : राज्यातील अतिवृष्टीला पार्श्वभूमीसाठी केंद्राचं पथक राज्यात आत्ता पाहणीसाठी येतं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये. आता पथक नको तर मदत पाठवा असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, केंद्राचं पथक आज शिवारात जाऊन काय पाहणार, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही केंद्र सरकारच्या पथकावर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन”
भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील
“असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं”