मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात संचारबंदी केली जाणार आहे. तसेच 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालवाधीत ही संचारबंदी लागू असणार आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याने ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन”
भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील
“असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं”
“इचलकरंजीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी”