Home महाराष्ट्र “असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं”

“असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं”

मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. यानंतर आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी 2 महिन्यांनी पथक आलं आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2 महिने 6 दिवसानी अतिवृष्टीचे झालेले नुकसान पाहण्यास केंद्रीय पथक आले आहे. आता शिवारात जाऊन काय बघणार ? शेतकर्यांनी खासगी सावकराकडून पैसे घेऊन जमीनीची साफ सफाई करून हरभरा ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल “फसल तो बहुत अच्छी है “ इनको मदत करने कि जरूरत नही., असं राजू शेट्टी म्हणाले.

वा ! असा तत्पर चौकीदार मिळायला नशिब लागत., असं म्हणत राजू शेट्टींनी मोदींना टोला लगावला आहे. 

महत्वाच्या घडामोडी-

“इचलकरंजीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी”

…त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार?; भातखळकरांची शिवसेनेवर टीका

महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा- देवेंद्र फडणवीस

महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता- निलेश राणे