Home महाराष्ट्र “…म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार”

“…म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार”

मुंबई : श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपला लगावला आहे.

राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो करसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

अयोध्येतील राममंदीरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सूरु होणार आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे, असं म्हणत शिवेसेनेनं भाजवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हातरी थांबवायलाच हवा. मंदिर निर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तो दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच आहे. हे राम, असं अग्रलेखात म्हटंल आहे.

महत्वाच्या घडामोडी-

BREAKING NEWS! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

“अकरावी प्रवेशासाठी विशेष वेळापत्रक जाहीर”

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे