मुंबई : जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणेंनी टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
अजित पवार हे स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच आज त्यांना जे काही मिळालं आहे ते केवळ शरद पवारांमुळेच, त्यावर त्यांनी स्वत:चं लेबल लावू नये, असा टोलाही यावेळी निलेश राणेंनी लगावला.
अजित पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात. लोकोपयोगी कामांसाठी अजित पवार हे चर्चेत नसतात, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, अजित पवारांची स्वत:ची ताकद नाही. बारामतीत जी ताकद आहे ती शरद पवार यांनी स्वत: निर्माण केलेली आणि टिकवलेली आहे. अजूनही शरद पवार यांचं लहानसहान गोष्टींवरही लक्ष असतं. अजित पवार यांनी ते काही केलं नाही त्यामुळे ते काही श्रेय घेऊ शकत नाही. अजित पवारांचा स्वत:चा आमदार आहे असं चित्र महाराष्ट्रात तरी नाही त्यामुळे त्यांनी मोठ्या गोष्टी करू नये, असंही निलेश राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण”
“भाजपचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?”
हवेत झेप घेत विराट कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पहा व्हिडीओ
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे- गोपीचंद पडळकर