मुंबई : जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा. यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. वर्षा निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते.
समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंका. संपर्कमंत्री, पालकमंत्री यांच्याशी समन्वय वाढवा. एकजुटीने या निवडणुकींना सामोरे जा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजना सक्षमपणे राबविण्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत काम करा. राज्यातील रुग्णांचा आकडा कमी होत आहे. त्यामुळे कोरोना हद्दपार झाल्याशिवाय शांत बसू नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करू शकलो असतो पण…; पडळकरांचं राऊतांना पत्र
“भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल”
कोण संजय राऊत?; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका
अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं; चंद्रकांत पाटलांचा टोला