मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकुचंद पडळकर असा उल्लेख केला होता. यावर गोपीचंद पडळकरांनी संजय राऊतांना खमखमीत पत्र लिहित संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. पडळकरांनी हे पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.
सामना मी कधी वाचत नाही. सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत.त्याचसाठी हा पत्र प्रपंच, असं ट्विट पडळकरांनी केलं आहे.
सामना मी कधी वाचत नाही सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला .सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली .त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत.त्याचसाठी हा पत्र प्रपंच @rautsanjay61 @SaamanaOnline pic.twitter.com/n7F5eUsFxi
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 18, 2020
खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे., असं पडळकर म्हणाले.
आपण सामनाच्या अग्रलेखात जी मुक्ताफळं उधळली आहेत ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले की, ‘महाराष्ट्रात हुकूमशाही आणि आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते. पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, असंही पडळकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल”
कोण संजय राऊत?; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका
अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं; चंद्रकांत पाटलांचा टोला
राज्य सरकारला अहंकारी म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…