Home महाराष्ट्र मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण केलं- अजित पवार

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण केलं- अजित पवार

मुंबई : मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण केलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते विधानसभेत बोलत होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की करोना काळात आम्ही राजकारण केलं नाही पण मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राजकारण केलं, असंही पवार म्हणाले.

घाईनं मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला असता तर निर्णय घेण्यासाठी एवढी घाई का केली असती असाही प्रश्न विरोधकांनीच आम्हाला विचारला असता. त्यामुळे दोन्हीकडून बोलायचं अशी भूमिका विरोधी पक्ष घेत आहे, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात चांगलं काम केलं नाही हा आरोप चुकीचा आहे. सरकारने आणि जनतेने मिळून चांगलं काम केलं आहे असं अजित पवार यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला

“गणपतीपुळे येथे समुद्रात बुडताना 2 पर्यटकांना वाचवलं”

सामना आता जुना सामना राहिला नाही, असं म्हणत फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर

ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा प्रश्न मिटवा- देवेंद्र फडणवीस