नवाज शरीफ, जीव वाचविण्यासाठी मोदींना लपून भेटले; इम्रान खान यांचा धक्कादायक आरोप

0
381

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पाकिस्तान : पाकिस्तान सरकार सध्या धोक्यात आहे. त्यामुळे सरकार वाचविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून जोरदार प्रयत्न सूरू आहेत. अशातच इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवाज शरीफ हे नरेंद्र मोदींना जीव वाचवण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटत होते. पाकिस्तानी सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ यांचा हा प्रयत्न सुरू होता, असा धक्कादायक आरोप इम्रान खान यांनी केला.

हे ही वाचा : ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा भाजपला इशारा, म्हणाले…

जनरल शरीफला नरेंद्र मोदी दहशतवादी म्हणत होते. आणि नवाज शरीफ मोदींचं कौतुक करत होते, अशा वेळी मी तर शांत बसलो नसतो. मात्र नवाज शरीफ दोस्ती करत होते. आणि मोदीही शरीफ यांच्या घरच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावत होते., असंही इम्रान खान यांनी यावेळी केला.

दरम्यान, एकीकडे ड्रोन हल्ल्यात सर्वसामान्य लोक मारले जात होते आणि नवाज शरीफ म्हणत होते, मला नाही फरक पडत त्यांच्या मरण्याने, ही कोणती पद्धत आहे?, अशा प्रश्न इम्रान खान यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याचा टीझर व्हायरल, बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब काॅपी”

‘या’ निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी, सभापतीपद भाजपकडे

कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच; UPA अध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटलांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here