Home देश “गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी”

“गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी”

नवी दिल्ली : काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही. तसेच गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी असं वक्तव्य प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा हे भाजपाचे 3 प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. शिवाय या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून ते हीच गोष्ट करत आहे, असं रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या लेखामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपपेक्षा काँग्रेसची परिस्थिती उलट आहे. काँग्रेसमधील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी काँग्रेसचे 3 मोठे नेते आहेत. कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे, असंही रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. तसेच पुढील लोकसभा निवडणुकींसाठी अजूनही 3 वर्षे बाकी आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये काँग्रेसने स्वत:ला पुन्हा उभं केलं पाहिजे., असंही गुहा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो; थुकरटवाडीच्या सेटमध्ये पंकजा मुंडेंचा टोला

अभिनेत्री ऋचा चड्ढाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘शकीला’ चा टीझर रिलीज; इंटिमेट सीनचा धुमाकूळ

उद्या 11 डिसेंबर रोजी सर्व दवाखाने बंद राहणार; IMA ची राष्ट्रवादी बंदची हाक

“रावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”