पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. नरेंद्र भिडेंच्या निधनानंतर अभिनेते प्रविण तरडे यांनी दु:ख व्यक्त केलं.
आपल्या फेसबुक आकाऊंटवरुन नरेंद्र भिडे यांनी ज्यादिवशी ‘अरारारारा… खतरनाकssss’ हे संगीत कंपोज केलं, त्या दिवसाचा व्हिडीओ शेअर करत प्रविण तरडेंनी आदरांजली वाहिली आहे.
माझा हक्काचा एकुलता एक संगीतकार गेला. ऊन ऊन वठातून , आभाळा आभाळा , अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही, असं म्हणत प्रविण तरडे यांनी दु:ख व्यक्त केलं.
महत्वाच्या घडामोडी-
तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिर्डीत फटाके फोडून जल्लोष
शक्ती कायदा सर्वांसाठीच एकसमान, मग ते…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
दानवेंनी पुरावे द्यावेत, केंद्राने सर्जिकल स्ट्राईक करावा- संजय राऊत
“रावसाहेब दानवे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे”