पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. यावर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं भांडण आहे. पण याचा फायदा मी दुसऱ्याला घेऊ देणार नाही. मी भाजपसोबतच असणार असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपवर नाराज असलो तरी आपण एनडीएमध्येच आहोत आणि यापुढेही एनडीएमध्येच राहणार आहोत. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असंही जानकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”
महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं- प्रकाश जावडेकर
दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे
मिशेल स्वीपसनची शानदार गोलंदाजी: ऑस्ट्रेलियाची भारतावर 12 धावांनी मात; भारताने मालिका जिंकली