मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की, सध्या जे आंदोलन दिल्लीत सुरू आहे, ते आंदोलन संपूर्ण भारतभरात पसरण्यासाठी साऱ्यांनी सहभागी व्हा. केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. असं घडलं तरच सरकारवर दडपण येईल. पण रस्त्यावर उतरून आंदोलन करताना एका गोष्टीचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे की कोणत्याही प्रकारचा हिंसक प्रकार घडून द्यायचा नाही., असं अण्णा हजारे म्हणाले.
दरम्यान, सरकार केवळ आश्वासनं देतं पण मागण्या कधीच पूर्ण करत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मी आधीही पाठिंबा दिला होता आणि आताही पाठिंबा देत राहीन, असं आश्वासन अण्णा हजारे यांनी यावेळी दिलं.
महत्वाच्या घडामोडी-
मिशेल स्वीपसनची शानदार गोलंदाजी: ऑस्ट्रेलियाची भारतावर 12 धावांनी मात; भारताने मालिका जिंकली
प्रत्येक जातीची जणगणना व्हावी- रामदास आठवले
“शिवसेना ही शरद पवारांच्या चरणी लीन झाली आहे; प्रवीण दरेकरांचा टोला
मैथ्यू वेड-ग्लेन मैक्सवेलची आक्रमक फलंदाजी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य